पिग्मी एजंट सायली घाडी यांच्यावर राजकीय रागातून कारवाई ;बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला जाब
सिंधुदुर्ग,दि.१६ डिसेंबर
सिंधुदुर्ग बँकेच्या मोंड शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांना बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे.याविरोधात जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयासमोर जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. यावेळी उपोषणस्थळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी भेट दिली. त्यावेळी बँक संचालक व्हिक्टर डाँन्टस, सुशांत नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर श्री. गावडे निरउत्तर झाले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे यांनी बँक संचालक सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देवुन उपोषण मागे घेण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयासमोर सोमवारी सकाळपासुनच बँक संचालक सुशांत नाईक यांनी लाक्षणिक उपोषण सुरु केले होते. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर,युवा सेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके,देवगड युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी, मेघनाथ धुरी, आत्माराम ओटवणेकर,प्रसाद बांदेकर, गणपत देसाई, अनंत पिळणकर,उत्तम लोके, तेजस राणे, इर्षाद शेख, संजय देऊरुखकर, विष्णू घाडी, प्रकाश भेकरे, संतोष घाडी, वसंत सोमने, रवींद्र जोगल, धीरज मेस्त्री, सचिन पवार, संदीप तोरस्कर, राजू शेट्ये, भालचंद्र दळवी, मंगेश फाटक, विलास गुडेकर, रोहित राणे, स्वप्निल धुरी, रोहित पावसकर, प्रथमेश सावंत, मंदार शिरसाट, सिद्धेश राणे, संदीप गांवकर, जानव्ही सावंत, प्रतीक्षा साटम, जेबा खुरेशी, हर्षा ठाकूर, हेलन कांबळी, संजना कोलते, वैदेही गुडेकर आदी उपस्थित आहेत.
सायली घाडी मागील 24वर्षे पिग्मी एजंट म्हणून कार्यरत आहेत.दरमहा3 लाखांची उलाढाल त्या करतात.मात्र सायली घाडी ह्या ठाकरे शिवसेना पक्षाचे काम करतात या रागाने आकसापोटी बँकेकडून घाडी याना कामावरून कमी केले आहे.सायली घाडी यांनी पिग्मी एजंट म्हणून जिल्हा बँकेच्या हितासाठी ठेवी गोळा केल्या आहेत. राजकीय आकसापोटी घाडी याना कामावरून कमी करण्यात आले आहे. मागील24 वर्षे प्रामाणिकपणे पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या घाडी यांनी बँकेचे हितच जोपासले. त्यांच्यावरील कारवाई मागे घ्या, अशी मागणी संचालकांच्यावतीने जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे करण्यात आली.