मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मालवण पोलिसांनी रामू नाईक या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

मालवण,दि.५ फेब्रुवारी

मालवण देऊळवाडा येथे रविवारी रात्री डंपरने दिलेल्या धडकेमुळे मृत्यू झालेल्या मालवण देऊळवाडा येथील विजय वसंत नाईक याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मालवण पोलिसांनी रामू लवू नाईक (वय ३२) राहणार यादगीर कर्नाटक या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोईप येथील मूळ रहिवासी असणारे आणि सध्या देऊळवाडा येथे वास्तव्यास असलेले विजय वसंत नाईक हे रविवारी रात्री आपल्या सायकलने बाजारात जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली होती. या धडकेत विजय नाईक हे जागीच ठार झाले होते. या अपघातानंतर डंपर चालक व डंपर मालकाला स्थानिकांकडून प्रसादही देण्यात आला होता. या अपघाताची खबर मालवण पोलीस स्थानकात सुहास पुंडलिक वालावलकर रा. देऊळवाडा मालवण यांनी दिल्यानंतर डंपर चालक रामू लवू नाईक याच्यावर भा.द.वी कलम ३०४ अ, ३३७, ३३८, ३७९, मोटार व्हेइकल ऍक्ट १८४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष नांदोसकर करत आहेत.