पळसंब गावठणवाडी येथील सत्यवती परब यांचे निधन

मसूरे ,दि.१७ डिसेंबर 

पळसंब गावठणवाडी येथील श्रीम. सत्यवती नारायण परब (85 वर्ष ) हिचे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे, मुली, सुन, नात, नातु असा मोठा परिवार आहे. श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे कार्यकारणी सभासद व पळसंब ग्रामपंचायत सदस्य श्री.अक्षय परब यांच्या त्या काकी होत.