काजूला भावांतर योजनेअंतर्गत २०० रुपये हमीभाव द्यावे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी आ. प्रमोद जठार यांची मागणी

कणकवली दि.५ फेब्रुवारी(भगवान लोके)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकणातील काजू उत्पादक यांचा काजूला भावांतर योजनेअंतर्गत हमीभाव रूपये २०० किंवा अनुदान द्यावे अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली. लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले आहे.