कोंकण विभाग ग्रंथालय संघाच्या अधयक्षपदी श्री दिलीप कोरे यांची बहुमतनिवड

सावंतवाडी,दि.१७ डिसेंबर 

कोंकण विभाग ग्रंथालय संघाच्या अधयक्षपदी श्री दिलीप कोरे (अध्यक्ष बृहांमुंबई ग्रंथालय संघ) यांची बहुमतनिवड झाली. ! तसेच श्री मंगेश मसके , श्री गजानन कालेकर, श्री कैलास जाधव महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रतिनिधि म्हणून बिनविरोध निवडण्यात आले व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघा च्या अध्यक्ष पदासाठी 5 जानेवारी२०२5 निवडणुक होत आहे त्यासाठी आपल्या कोकण विभागाचे व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्षश्री मंगेश मसके याना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून एकमताने ठरविण्यात आले… रायगड येथे रविवारी बैठक झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघावर कोकण विभागातून प्रतिनिधी पाठवण्यात आले आहेत येत्या पाच जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वर कोकणातून प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे श्री मस्के यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधीपदी एक मताने निवड झाल्याबद्दल कोकण विभागातून सर्व ग्रंथालय संघाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ. श्री गावडे. श्री शिंदे आधी उपस्थित होते