दोडामार्ग, दि. १७ डिसेंबर
साटेली भेडशी बाजारपेठेत अनेक जण चक्क रस्ता साईडपट्टी अडवून काही जण भाजीपाला, फळे, फुले, वडापाव, इतर साहित्य विक्री केली जात आहे. शिवाय रस्ता दुतर्फा लावलेली वाहने यामुळे साटेली भेडशी बाजारपेठेत वाहतूक कोंडी समस्या गंभीर बनत चालली आहे. तेव्हा ग्रामपंचायत पथकर गोळा करते तेव्हा अशा विक्रेत्यांना वाहतूकीला अडथळा निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने दुकाने लावण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
साटेली भेडशी बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा सूरु असते. शिवाय रस्ता काही ठिकाणी अरूंद आहे. पण रस्ता दुतर्फा लावलेली वाहने तसेच काही जण भाजीपाला, फळे, फुले, वडापाव दुकाने ही डांबरी रस्ता साईडपट्टी अडवून दुकाने लावली जातात यामुळे एस टी बस किंवा इतर वाहने यांना या दुकानामुळे सुटत नाही अडकून पडतात त्यांच्या मुळे अडवून वाहतूक कोंडी होते.
दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर हा मार्ग आहे . साटेली भेडशी बाजारपेठेतून जातो पर्यायी मार्ग नाही. दुकाने रस्ता साईडपट्टी अडवून लावलेली यामुळे अनेक वाहने पुढे घेता येत नाही. समोर आलेल्या एस टी बस इतर वाहनांना बाजू मिळत नाही. ग्रामपंचायत कडून सोपाकर गोळा केला जातो. तेव्हा होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रस्ता साईडपट्टी सोडून दुकाने लावायला सूचना करावी अशी मागणी वाहन धारक ग्रामस्थ करत आहेत,