दोडामार्ग, दि. १७ जानेवारी
दोडामार्ग तालुक्यातील भेडशी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सन १९८६ मधिल दहावी मधिल माजी विद्यार्थी तसेच १९८८ मधिल बारावीचे विद्यार्थी यांचे एकञित स्नेहसंमेलन दि. १२ जानेवारी २०२५ रोजी भेडशी येथे होणार आहे. तरी वरील बॅच मधिल माजी विद्यार्थी यांनी आपली नाव नोंदणी करावी असे माजी विद्यार्थी वतीने कळविले आहे.
धि बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणी मुंबईत अनेक शाळा आहेत.
त्यापैकी न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी ही नावाजलेली शाळा आहे. या शाळेची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली.
या शाळेतून शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी आजवर देश-विदेशात चांगला नावलौकिक कमवत आहेत. न्यू इंग्लिश स्कूल ,भेडशी शाळेचे नाव उज्वल करत आहेत.
भेडशीच्या पंचक्रोशीतून अनेक विद्यार्थी आपले दहावी ,बारावी पर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करत आहेत. दुर्गम भागातून आलेले विद्यार्थी दहावी, बारावी मध्ये उज्वल गुणांनी उत्तीर्ण होण्याची परंपरा सातत्याने राखत आहेत.
तसेच क्रीडा क्षेत्रात तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रस्तरावर आपली कायम चुणुक दाखवत असतात.
अशा या न्यू स्कूल, भेडशी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची १९८६ ची दहावीची बॅच व १९८८ ची बारावी बॅच यांचे एकत्रित स्नेहसंमेलन न्यु इंग्लिश स्कूल, भेडशी येथे रविवार दिनांक १२/१/२०२५ रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी शाळेतील माजी आजी शिक्षक, कर्मचारी यांच्या प्रति कृतज्ञता सोहळा करण्यात येणार आहे.
याबाबत बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना संपर्क करण्यात आलेला आहे. तरी काही कारणास्तव ज्यांचा संपर्क झाला नसेल ,त्यांनी कृपया अधिक माहितीसाठी नंदकुमार टोपले (७६२०४२५१७२), प्रसाद गोलम (७७९६५९५९९८,९४२१६४९९८६ ),ॲनेट परेरा(८८२८३७७३१५) यांच्याशी संपर्क साधवा.
तरी १९८६ ते १९८८ च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनास आवर्जून उपस्थित रहावे.
स्नेहसंमेलनासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक , कर्मचारी वर्ग यांच्यासाठी सकाळी ८.३० वाजता शाळेसमोरील रेस्ट हाऊस मध्ये अल्पोपाराची सोय केलेली आहे.
असे माजी विद्यार्थी संघाकडून आवाहन करण्यात आले आहे.