चिंदर सेवा संघाचे आयोजन, तेवीस दात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान
आचरा, दि. १७ डिसेंबर (अर्जुन बापर्डेकर)
चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे चिंदर सेवा संघ आयोजित संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबीराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, उपसरपंच दिपक सुर्वे, जिल्हा ब्लड बँक डॉ. पल्लवी सुरवसे, अमृत साटम, प्रदीप दळवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
चिंदर सेवा संघ गेलें पाच वर्ष
रक्तदान शिबीर घेत असून अनेक व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी या रक्तदान शिबिरात झालेल्या उपयोग झाला आहे असे यावेळी बोलताना अध्यक्ष प्रकाश मेस्त्री म्हणाले तर उपसरपंच दिपक सुर्वे, मुंबई पोलीस दलातील निवृत्त प्रदीप दळवी यांनी रक्तदान शिबिराला शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक, सूत्रसंचालन, समारोप ओमकार गोलतकर यांनी केला.
रक्तदान शिबिरात नारायण चिंदरकर, सचिन चिंदरकर, आशिष कोरगावकर, प्रथमेश अपराज, प्रज्ञेश चिंदरकर, प्रतीक मुळ्ये, हरेश पडवळ, रणजित दत्तदास, गोविंद गांवकर, रवींद्र गांवकर, दत्ताराम सावंत, शंकर पालकर, मयूर आचरेकर, आनंद कामतेकर, राजन गांवकर, विराज सावंत, शिशिर पालकर, प्रथमेश चव्हाण, दिपक तावडे, प्रितेश आडकर, राजेंद्र चिंदरकर, समिर अपराज, केतन कावले या तेवीस रक्तदात्यानी रक्ताचे पुण्यदान केले. तर सुनिल चिंदरकर, सुनिल देऊलकर, भक्ती राणे यांनी सहभाग दर्शवला.
या शिबीरासाठी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, सल्लागार भाई तावडे, चंद्रशेखर पालकर, संतोष अपराज, खजिनदार गणेश गोगटे, कार्यवाह सिद्धेश गोलतकर, सहकार्यवाह आशिष कोरगावकर, निशांत पारकर, सचिन चिंदरकर, विवेक परब, ओमकार गोलतकर, प्रसाद टोपले, अजित साटम आदींनी मेहनत घेतली. चिंदर सेवा संघाच्या वतीने रक्तदात्याचे आभार मानण्यात आले.