सावंतवाडी,दि. १७ डिसेंबर
पूज्य साने गुरुजी शतक रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिरच्यावतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये साने गुरुजींच्या जीवन परिचय व साहित्यबाबत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २४ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेचा शुभारंभ बुधवारी १८ डिसेंबर रोजी चौकुळ गावातून करण्यात येणार आहे.
या व्याख्यानमालेत १) चला समजून घेऊया श्यामची आई, २) साने गुरुजींच्या साहित्याचा परिचय, ३) साने गुरुजींचे मातृप्रेम, ४) थोर सेनानी साने गुरुजी, ५) साने गुरुजींच्या कथांचे कथाकथन अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. भरत गावडे, द .म. गवस, शंकर प्रभू आदी मान्यवर व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत
साने गुरुजींच्या जीवन व साहित्य यावरील ही कथामाला चौकुळ, आंबोली, दाणोली, माडखोल, कारिवडे या परिसरातील शाळा शाळांमध्ये घेतली जाणार आहेत. या व्याख्यानमालेत प्रत्येक शाळेला श्यामची आई हे पुस्तक भेट म्हणून दिले जाणार आहे. या विषयावर
या व्याख्यानमालेचा लाभ परिसरातील शाळांनी घ्यावा असे असे आवाहन साटम महाराज मराठी वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे, सचिव डॉ एल डी सावंत, सहसचिव गजानन गावडे, ग्रंथपाल दीपा सुकी यांनी केले आहे.