अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा या प्रशालेच्या ३७ विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण

हिंदी राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षा व राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षा

देवगड,दि.१७ डिसेंबर

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या हिंदी राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षा व राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षा यामध्ये अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा या प्रशालेच्या ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ३७ विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९७.२९ एवढा लागला आहे. या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी व सातवीचे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेसाठी प्रशालेचे सहा. शिक्षक श्री.विकास पवार, श्री सचिन मोरे, श्री हरिश्चंद्र कुबल व श्री निलेश तिर्लोटकर यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.सुनील घस्ती सर्व संस्था पदाधिकारी,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.