कणकवली,दि.१७ डिसेंबर
चक दे इलेव्हन कला क्रीडा मंडळ जंगमवाडी क्रिकेट स्पर्धा संपन्न हरकुळ बुद्रुक जंगमवाडी येथे भाजप पुरस्कृत चक दे इलेव्हन कला क्रीडा मंडळाने ओव्हरम क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती
स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी माननीय श्री संदेश उर्फ गोटया सावंत साहेब, हरकुळ बुद्रुक गाव तंटामुक्ती अध्यक्ष श्री.राजूभाई पेडणेकर, सन्माननीय बाबासाहेब वर्देकर सर, सन्माननीय बुलंदजी पटेल साहेब डॉ. सुहास पावसकर साहेब,ग्रामपंचायत सदस्य श्री.चंद्रकांत परब, श्री.आबा खोचरे श्री.बाबा मोर्ये,श्री. बाबू सातवसे,श्री.मामा माणगावकर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.15000 व भव्य ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक रु. 10000 व ट्रॉफी ठेवण्यात आले होते. सदर पारितोषिके सन्माननीय श्री.संदेश उर्फ गोटया सावंत साहेब यांच्यामार्फत देण्यात आली.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेता ठरला शिवरा सुपर कणकवली संघ, उपविजेता साकेडी संघ. मंडळाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले