संघटनेचे अध्यक्ष बुवा भगवान लोकरे व बुवा संतोष कानडे यांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट
कणकवली दि.१७ डिसेंबर
अखंड भारतवर्षात विविध संमेलने पार पडत असतात. महाराष्ट्रात अखिल भारतीय नाट्य संम्मेलन, साहित्य संमेलन इत्यादी सरकारी अनुदानाच्या माध्यमातून पार पडत असतात. परंतु भजनासारख्या पारंपारिक संस्कारी प्रभावी माध्यमाला कुणी वाली नाही. त्यामुळे भजनीकलेला शासन मान्यता मिळावी अशी मागणी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) या प्रमुख शिखर आणि नोंदणीकृत संस्थेमार्फत राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण उपस्थित रहा अशी विनंती देखील नितेश राणे यांची भेट घेत करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी पहिल्यांदाच देशपातळीवरील सर्व भजनी मेळ्यांना एकत्र गुंफण्यासाठी कोकणातल्या या भजन संस्थेमार्फत अखिल भारतीय भजन संमेलनाचे नियोजन १८ आणि १९ जानेवारी २०२५ असा सलग दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्वरूप शोभायात्रा, भजनस्पर्धा, परिसंवाद, प्रहसन, जीवन गौरव पुरस्कार, गायन, सोलो वादन, मान्यवरांचे स्वागत, सत्कार करण्यात आले आहे. डी एम सी सी दादर माटुंगा कल्चरल सेंटर या नाट्यगृहात हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे.सुमारे आठ ते दहा लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. आपल्या कोकणातील भजनी कलावंत एवढा मोठा घाट घालत असताना सरकार दरबारी कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. पैशाचे सोंग घेणे संघटनेसाठी अग्नीदिव्यच आहे. तरी हा कार्यक्रम दरवर्षी सरकारी अनुदानाच्या माध्यमातून मंजूर व्हावा, जेणेकरून हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि सुशोभित करता येईल आणि पारंपारिक संस्कारी भजन संस्कृती जोपासण्यात मदत होईल,असे निवेदन अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ संघटनेचे अध्यक्ष भगवान लोकरे यांनी यांनी मंत्री नितेश राणे यांना दिले आहे.
यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे आदी उपस्थित होते.