कोळंब भटवाडी येथे ‘गीता जयंती’ कार्यक्रम

मालवण,दि.१७ डिसेंबर 

एकादशी दिवशी गीता जयंतीनिमित्त कोळंब भटवाडी येथील गोपाळकृष्ण मंदिर येथे गीता जयंती कार्यक्रम झाला. दीप प्रज्वलन व गोपाळ कृष्ण मूर्ती पूजा शेडगे सर आणि अन्य मान्यवरांनी केली. धर्मग्रंथ गीतेच्या १२ व्या अध्यायाचे पठण संस्कृत भाषेचे अभ्यासक शेवडे सर यांनी केले. या अध्यायाचे सामूहिक गायन करण्यात आले.

यावेळी कणेरकर गुरुजी, दर्शना प्रभूगावकर यांनी मनोगते व्यक्त केली. भगवत गीतेचे महात्म्य प्रमुख वक्ते चंद्रकांत गोखले यांनी समजावून सांगितले. आदर्श गुरु हाच मन परिवर्तन करू शकतो. ५१६१ वी ही ‘गीता जयंती’ असून अशी कुरुक्षेत्रं हे रणांगण आहे. तिथे युद्ध करणे सोडून भिक्षा मागण्याचा रस्ता पकडावा हे चुकीचे आहे हे श्रीकृष्णाने समजावून दिले. आज राजकारण करणाऱ्यांनी गीतेचा अभ्यास करावा. हा ग्रंथ व्यास ऋषी यांनी लिहिला असून आपण त्याचा अर्थ समजावून घेऊंन समोर चांगले काय, वाईट काय हे जाणून घेतले पाहिजे, हेच आपल्या जीवनाचे सार आहे, असे गोखले यांनी सांगितले.

गोपाळकृष्ण मंडळाचे अध्यक्ष जीतेंद्र भोजने, पदाधिकारी व सदस्य आणि शैलेश प्रभूगावकर, दर्शना प्रभूगावकर, सौ. बावकर, ग्रा.पं. सदस्य सुनील फाटक, सतीश ढोलम, आबा भोजने, विजय भोजने, आबा ढोलम, बापू लाड, राजन दळवी व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होता. स्वागत व सूत्रसंचालन लाउडर यांनी केले. रात्री ८ वाजता ब्राह्मण देव भजन मंडळ, न्हिवेच्या संगीताने कार्यक्रमाचा समारेप करण्यात आला. मंडळाचे सल्लागार सतीश ढोलम यांनी आभार मानले. बापू बावकर व शैलेश प्रभूगावकर यांनी प्रसाद वाटप केले.