सावंतवाडी,दि.१८ डिसेंबर
सावंतवाडी येथील संशोधक, कु. क्रांती निर्मला निशिकांत साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी अॅकडमी ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंनोव्हेटीव्ह रिसर्च (ACSIR) यांचेकडून पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. तिच्या पीएच.डी प्रबंधांचे शीर्षक होते ” एलेक्ट्रॉनिकली इंटिग्रेटेड लाइट अॅबझॉरबर्स फॉर इफिशियंट आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस – अ बेबी स्टेप टुवर्डस् कार्बन न्युट्रल इकॉनॉमी”. तिचे संशोधन कार्य डॉ. सी. एस. गोपीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ACSIR/CSIR- नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे करण्यात आले. कु. क्रांती हिने संशोधनादरम्यान 3 पेटंट प्राप्त केले आहे. कु. क्रांती हिचे B.Sc. चे शिक्षण श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे झाले.