शालेय राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत साडवलीच्या स्वरा सुरेश मोहिरे चे सुयश; राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड!

देवगड,दि.५ फेब्रुवारी  (दयानंद मांगले)
:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने १४, १७, १९ वर्ष वयोगटातील मुले व मुली यांच्या राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धां दि. २९ ते ३१ जानेवारी, २०२४ या कालावधीत संपन्न झाल्या.
कोल्हापूर विभागीय संघात रत्नागिरी जिल्ह्यातून या स्पर्धेत साडवली येथील
सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी सुरेश गोपाळ मोहिरे यांची मुलगी कुमारी स्वरा सुरेश मोहिरे हिने १४ वर्षे वयोगटातील कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. सध्या सुरेश मोहिरे हे रत्नागिरी येथे राहत आहेत त्यांचे मूळ गाव साडवली हे असून त्याचे अन्य कुटुंबीय आई ,भाऊ हे साडवली येथेच राहत आहेत
कु. स्वरा हिने मिळवलेल्या दैदीप्यमान यशामध्ये तिचा भाऊ सुरज सुरेश मोहिरे याचे विशेष मार्गदर्शन तिला लाभले आहे.
कुमारी स्वरा हीचे साडवली वासियांच्या वतीने जैनोन्नती मंडळ साडवली, दिगंबर जैन कासार समाज संस्था कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले यांनी ही तिचे विशेष कौतुक केले आहे व तिला पुढील यशासाठी शुभेच्छाही दिल्या.
यापूर्वी मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत देखील स्वराने द्वितीय क्रमांक मिळवला होता.