वेंगुर्ला,दि.१८ डिसेंबर
नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे श्रीमती वर्षा विश्राम किनळेकर यांच्या कायम निधीमधून कै.रामचंद्र विश्राम किनळेकर आणि कै. मंदाकिनी रामचंद्र किनळेकर स्मृती पारितोषिके सन २०२३-२४ पासून देण्यात येत आहेत. यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील माध्यमिक शाळेमध्ये इ.८वी ते १२वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या हुशार होतकरू ज्याची शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रात शाळेमध्ये विशेष चमक आहे अशा एक किवा दोन विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठी सदर पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी असा गुणवान विद्यार्थी, विद्यार्थीनी आपल्या शाळेत शिक्षण घेत असल्यास त्याचे नाव मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी २४ डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत संस्थेकडे पाठवावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८२७५६६७०९० यावर संफ साधावा.