वेंगुर्ला,दि.१८ डिसेंबर
कै.विष्णूपंत नाईक यांनी नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेचे कार्यवाह म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे. संस्थेच्या उत्कर्षास त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून नगर वाचनालय संस्थेतर्फे सिधुदुर्ग जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार देण्यात येत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.
शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख ५ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी सिधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांनी या पुरस्कारासाठी २४ डिसेंबरपर्यंत आपले प्रस्ताव कार्यालयीन वेळेत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.