आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कारासाठी आवाहन

 वेंगुर्ला,दि.१८ डिसेंबर

दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती सिधुदुर्ग जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि ५ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ संस्थेकडे १ लाख रूपये कायम निधी ठेवला आहे. त्यातून हा पुरस्कार दिला जात आहे. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. तरी सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांनी पुरस्कारासाठी आपले नाव, ग्रंथालयाचे नाव व इतर माहितीसह प्रस्ताव संस्थेकडे कार्यालयीन वेळेत २४ डिसेंबरपर्यंत पाठवावेत असे आवाहन केले आहे.