वेंगुर्ल्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला,दि.१८ डिसेंबर 

महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार दरवर्षी राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या परिषदेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आधार फाऊंडेशन, सिधुदुर्ग या संस्थेतर्फे ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शासकीय – निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय बँक, प्रायव्हेट बँक, पतसंस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, क्रीडा मंडळे यांनी आपल्यामार्फत किमान ५ व कमाल १० रक्तदाते सहभागी करून सहकार्य करावे असे आवाहन आधार फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.