वेंगुर्ला,दि.१८ डिसेंबर
नगर वाचनालय वेंगुर्ला संस्थेतर्फे निनाद कर्पे व कुटुंबिय पुरस्कृत स्व.भालचंद्र शंकरराव कर्पे स्मृती सुगम संगीत स्पर्धा १५ डिसेंबर रोजी घेण्यात आल्या. दोन गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत अदिती चव्हाण आणि मयंक दाभोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
इ.५वी ते ७वी गटातून प्रथम-अदिती चव्हाण (देसाई स्कूल), द्वितीय-शुभ्रा अंधारी (वेंगुर्ला नं.१), तृतीय-माधव ओगले (वेंगुर्ला नं.२), चतुर्थ-नील पवार (वेंगुर्ला नं.१), पाचवा – पायल नेरूरकर (देसाई स्कूल) यांनी तर इ.८वी ते १०वी गटातून प्रथम-मयंक दाभोलकर (दाभोली हाय.), द्वितीय-अमृता नवार (न्यू.इं.स्कूल उभादांडा), तृतीय-ऋतुज गोडकर (सरस्वती विद्या.आरवली), चतुर्थ-मैथिली केळुसकर (न्यू.इं.स्कूल उभादांडा), पाचवा-हेतल शिरोडकर (पाटकर हाय.) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सहदेव परब, विठ्ठल करंगुटकर, माया परब यांनी काम पाहिले. स्पर्धकांना गजानन मेस्त्री व अक्षय सरवणकर यांनी संगीतसाथ दिली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, महेश बोवलेकर, सर्वेश धावडे, गौरव धावडे, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना १९ जानेवारी रोजी पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहेत