मालवण,दि.१८ डिसेंबर
श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ मालवण च्या वतीने दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वा. मालवण देऊळवाडा आडवण येथील उत्तम चव्हाण यांच्या निवासस्थानी श्री संत गाडगे महाराज यांच्य पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी १० ते दुपारी १२. ३० या वेळेत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, नामस्मरण शिष्यवृत्ती वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, प्रमुख अतिथी यांचे गाडगे महाराज यांच्या जीवनावर विचार व कीर्तन, अल्पोपहार आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन परीट सेवा संघांचे अध्यक्ष मोहन वालकर, सचिव विनायक चव्हाण, खजिनदार कृष्णाजी परुळेकर यांनी केले आहे.