मालवण,दि.१८ डिसेंबर
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणची मासिक सभा दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता हॉटेल लिलांजली, भरड मालवण येथे अध्यक्ष सुभाष दिघे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी साने गुरुजी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त डॉ. सुभाष दिघे हे प. पू. साने गुरुजी यांची माहिती देणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन बाळकृष्ण माणगावकर यांनी केले.