देवगड तालुका चिरेखाण संघटना बंद करण्याचा निर्णय

चिरेखाण संघटनेचा सभेत सर्वानुमते घेतला निर्णय

देवगड,दि.१८ डिसेंबर 

देवगड तालुका चिरेखाण संघटनेतील सर्व व्यावसायिक सभासदांच्या एकमताने संघटना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलींद साटम यांनी दिली.

देवगड तालुका चिरेखाण चालक- मालक संघटनेची सभा बुधवारी विनायक उर्फ पिंटू आचरेकर यांच्या निवासस्थानी संघटनेचे अध्यक्ष मिलींद साटम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला सचिव काका जेठे, खजिनदार बाबा कोकरे तसेच किरण टेंबुलकर, संजय बोडेकर, बबन बोडेकर, विनायक आचरेकर, रूपेश खोत आदी 33 चिरेखाण व्यावसायिक उपस्थित होते.या सभेमध्ये सर्वानुमते चिरेखाण संघटना बंद करावी असा निर्णय घेण्यात आला अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलींद साटम यांनी दिली.