सार्वजनिक बांधकाम विभागाचे सिंधुदुर्गात नवीन मंडळ कार्यालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता ;कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या पाठपुराव्याला यश

कणकवली दि.६ फेब्रुवारी (भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र्य मंडळ कार्यालय स्थापन करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनी केली होती.सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी आजच्या बैठकीत मिळाली आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता केली आहे. कणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय मंजुरी देण्यात आली.त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे एकच सार्वजनिक बांधकाम मंडळ असून, स्वतंत्र मंडळ स्थापन झाल्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या गतीमान कामकाज होणार आहे.या नवीन मंडळ कार्यालयासाठी १७ पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असून यातील १० नियमित पदे व ७ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहेत.त्यामुळे बऱ्याच वर्षाची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.

सद्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी मिळून एकच मंडळ कार्यालय रत्नागिरी येथे कार्यरत आहे. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात दापोली पासून दोडामार्ग पर्यंत सुमारे ४०० किलोमीटरचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या.आता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय मंजुरी मिळाल्याने बांधकाम विभागाचे कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी विकास निधी अधिक प्राप्त होऊन विविध प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पद्धतीने होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी सा बां विभागाकडे मिळून सुमारे २ हजार किलमीटर लांबीचे राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी सुस्थीतीत आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.तसेच महत्वाचे व मोठे प्रकल्प जसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घोटगे – सोनवडे घाटरस्ता बांधकाम तसेच पर्यटन विषयक अनेक कामे वेगाने होतील. तसेच बांधकाम विभागाची कामे अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे.पालकमंत्री नामदार रविंद्र चव्हाण यांचे कौतुक केलं जात आहे.