महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अबिद नाईक यांच्या निवासस्थानी दिली भेट

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या कुटुंबाच्यावतीने रुपाली चाकणकर यांचा सत्कार

कणकवली दि.१८ डिसेंबर

महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी नाईक कुटुंबीयांच्या वतीने रुपाली चाकणकर यांचा शाल,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, आई हवाबी अब्दुल नाईक, वडील अब्दुल नाईक, पत्नी हुमेरा अबिद नाईक, वहिनी नझमा नाईक, मुलगी रिझा नाईक, पुतणी महेक नाईक, पुतणा अली नाईक,
प्रांतिक सदस्य विलास गावकर, सुभाष सावंत, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, महिला तालुकाध्यक्षा स्नेहल पाताडे, शहराध्यक्ष इम्रान शेख, सतीश पाताडे, युवक शहराध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, विशाल पेडणेकर, सचिन अडुळकर, केदार खोत आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.