प्रतिथयश साहित्यिक डॉ भा. वा,.आठवले यांचे निधन

देवगड,दि.१९ डिसेंबर
देवगड येथील प्रतिथयश डॉ
डॉ. भास्कर वामन आठवले यांचे गुरुवारी सकाळी ५.२५ वा. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित मुलगा , विवाहित मुलगी सून नातू, नातसून असा परीवार आहे.देवगड येथील डॉ सुनील आठवले यांचे वडील होत. देवगड मधील नामवंत सहित्यिक,लेखक कवी, संगीत तज्ञ,म्हणून त्यांचा विशेष परिचय होता.
डॉ भा.वा. आठवले यानी स्थापन केलेले देवगड मेडिकल फाउंडेशन (पूर्वीचे द न्यू क्लिनिक देवगड) गेल्या सात दशकांपासून उपचार आणि आरोग्यसेवेचा दीपस्तंभ ठरले आहे. छोट्या क्लिनिकपासून सुरुवात करून आज आधुनिक सुविधांनी युक्त पूर्णप्रगत डे केअर सेंटर बनलो आहे, जे देवगडवासीयांना अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यास वचनबद्ध आहे.मुलगा, डॉ. सुनील आठवले, डॉ. मंजुषा आठवले, डॉ. तन्मय आठवले, आणि डॉ. रिया आठवले यांच्या नेतृत्वाखाली, उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत
डॉ. भास्कर वामन आठवले यांनी १९५६ साली केलेली ही आरोग्य सेवा गेली
६८ वर्षे सेवाव्रताने समर्पित कार्य.करीत आहे.