विनापरवाना मासेमारी करणाऱ्या कर्नाटकी नौकेवर मत्स्य परवाना अधिकाऱ्यांची कारवाई

पंधरा दिवसात दुसरी कारवाई;मच्छीमारांमधून समाधान व्यक्त

देवगड,दि.१९ डिसेंबर

देवगड महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात १७ वावात आचऱ्या नजीक विनापरवाना गिलनेट द्वारे कर्नाटक येथील वैशाली या मासेमारी नौकेवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग मत्स्यव्यसाय विभागाने सयुक्तिक कारवाई करन मासेमारी करताना कर्नाटक मलपी येथील गिलनेट द्वारे मासेमारी नौकेवर रीतसर कारवाई केली आहे .ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्यव्यसाय आयुक्त अतुल पाटणे, सह आयुक्त महेश देवरे आणि प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी येथील रामभद्र हायस्पीड नौका आणि सिंधुदुर्ग येथील गस्ती नौका संयुक्तिक गस्त घालीत असताना
मत्स्यपरवाना अधिकारी पार्थ तावडे, चिन्मय जोशी,यांचे समवेत सुरक्षारक्षक धाकोजी खवळे,संतोष ठुकरुल,योगेश फाटक ,अमित बांदकर अल्पेश नेसवणकर दीपेश मायबा, सागर परब,चंद्रकांत कुबल,स्वप्नील सावजी,शुभम राऊळ,पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील,प्रणिल त्र्यंबके यांनी कारवाईत सहभाग घेतला.यात ताडोसे,पोपट,गेजर,बांगडा मासळी असून त्या मासळीचा लिलाव करण्यात आला. मत्स्यव्यसाय विभागाने मागील १५ दिवसात दुसरी कारवाई केल्याने मच्छिमारात समाधान व्यक्त होत आहे.