सावंतवाडी,दि.१८ डिसेंबर
वन्य प्राण्यांची संख्या वाढत आहे. जंगलात पाणी अन्न व अन्न साखळीतील प्राणी नसल्याने जंगली प्राणी लोकवस्तीत घुसून नुकसान करत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने जंगलात पाणी, अन्न व अन्न साखळीतील प्राणी उपलब्ध करण्यासाठी वन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जंगलातील या प्रदुषणाचा फटका शेतकरी व बागायतदारांना बसत आहे.
हत्ती, गवा रेडे, रानडुक्कर, लाल व काळ्या तोंडाची माकड,वानर, मोर,शेकरू आणि विविध प्रकारच्या वन्य प्राणी व पक्षी यांचा वावर लोकवस्ती मध्ये वाढलेला आहे. लोक डोंगर दऱ्याखोऱ्यात भात शेती, नागली पिकांची लागवड करतात तर फळबागा निर्माण केल्या आहेत. काजू पीकही घेतले जाते.
वन्य प्राणी व पक्षी जंगलात राहतील असे वातावरण नाही. अर्थात जंगलात प्रदूषण वाढत आहे. खाजगी डोंगर दऱ्याखोऱ्यात झाडांची कत्तल करून बागायती, रबर लागवड, अननस, पपई लागवड व अन्य उत्पादन घेतले जाते. शेती व बागायती व्यवसाय म्हणून स्वीकारल्यामुळे त्यांनी फिनिशिंग केले आहे. तेथे वन्य प्राणी जात नसल्याचे समोर आले आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावातील शेतकरी व बागायतदार यांना वन्य प्राणी व पक्षी यांनी हैराण करून सोडले आहे. त्यामुळे शेतकरी शेती व बागायती पिके घेत नाहीत असे समोर आले आहे. पिके व शेती बागायती नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न केला जातो. पण ती तुटपुंजी मदत घेण्यासाठी नाना अडथळे निर्माण होतात त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करत नाहीत असे समोर आले आहे.
वन्य प्राणी व पक्षी यांचा बंदोबस्त करण्यासाठी जंगलात वन विभागाने व्यवस्थापन निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी वन्य प्राण्यांचे अन्न, फळझाडे, पाणी, अन्न साखळीतील प्राणी जंगलात राहतील आणि मिळतील असे वन विभागाने व्यवस्थापन केले पाहिजे. ब्रिटिश कालीन वन कायदा बदलून बदलत्या काळानुसार बदल झाला पाहिजे. जंगलात फळझाडे लावली पाहिजेत पण तशी लागवड करण्याची तरतूद वन विभागाने केली पाहिजे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष झाला आहे.
केंद्र सरकारने वन कायद्यांत तरतूद करून फळझाडे लागवड करण्याची तरतूद केली पाहिजे. विविध पातळ्यांवर उपक्रम हाती घेतला पाहिजे. वन्य प्राणी व पक्षी जंगलात राहतील असे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून वन विभाग काय साध्य करु पाहत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हत्ती, गवा रेडा,रानडुक्कर, माकड शेतकरी व बागायतदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान करत त्रास देत आहेत. माकड आणि वानर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची वन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. हा कायमस्वरूपी तोडगा नसल्याने वन विभागाने जंगलात सर्व वन्य प्राणी व पक्षी यांचा वावर वाढविला पाहिजे म्हणून वन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शहरातील घरोघरी माकड पोहोचले असून दरवाजा उघडून ठेवला तर माकडे घरात येत आहे. फळझाडांच्या बागांचे नुकसान करत आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वन विभागाने जंगलात पाणी, अन्न व अन्न साखळीतील प्राणी मिळतील असे वन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे तसेच फळझाडांची लागवड देखील करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा शेतकरी व बागायतदार नुकसानग्रस्त बनतील.
Home आपलं सिंधुदुर्ग जंगलात पाणी अन्न व अन्न साखळीतील प्राणी नसल्याने जंगली प्राणी लोकवस्तीत घुसून...