देवगड,दि.१९ डिसेंबर
अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा येथे गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.अरुण देवकर, श्री.निलेश पाटील, श्री.प्रवीण त्रिंबके यांनी भेट देत सायबर क्राईम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायबर क्राइम हा विषय विद्यार्थ्यांना माहीत असावा, ऑनलाईन फ्रॉडबद्दल विद्यार्थी जागरूक व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सोशल मिडियापासून विद्यार्थ्यांनी लांब रहावे तसेच आपले पालक व सर्व मित्रमंडळी यांना याबाबतची माहिती द्यावी, ऑनलाईन फ्रॉड पासून आपण लांब रहावे, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच ओटीपी कोणाशीही शेअर करू नये, मोबाईलचा वापर विधायक कामासाठी करावा. स्थानिक, राज्यस्तरीय बातम्यांचे वाचन करावे तसेच सामान्यज्ञान वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे व्यसनांपासून दूर रहा असे आवाहन श्री.अरुण देवकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.स्मिता तेली, इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.