आचरा, दि. १९ डिसेंबर (अर्जुन बापर्डेकर)
बुधवारी चौथ्या दिवशी गाव भरण्याचा कौल न मिळाल्याने पुन्हा
गुरुवारी दुपारी लावलेला गाव भरण्याचा कौल रामेश्वराने दिल्याने इशारयाची तोफ धडाडली नौबत वाजू लागली बारापाच मानकरयांनी बंद केलेला दिंडी दरवाजा मानकरयांनी उघडला
आणि वेशीबाहेर गेलेल्या ग्रामस्थांपर्यंत ही खबर पोहोचताच पुन्हा घराच्या ओढीने वेशीबाहेर गेलेले ग्रामस्थ गावाकडे परतू लागले. सोबत नवा उत्साह आणि नवा जोश घेऊनच. मिळेल त्या वाहनाने कुणी डोक्यावरून सामान घेऊन गुराढोरांसह गावात परतत होते. त्यामुळे गेले चार दिवस मालवण ,देवगड, कणकवली या बाजूचे मनुष्य झालेले रस्ते पुन्हा वर्दळीने फुलून गेले होते. .रविवार १५ डिसेंबर पासून सुरू झालेल्या गावपळणीनिमित्त आचरेवासिय गावाच्या वेशी बाहेर निसर्गाच्या सानिध्यात तीन दिवस तीन रात्रीसाठी जमले होते.मात्र बुधवारी चौथ्या दिवशी गाव भरण्याचा रामेश्वर देवाचा कौल मिळाला नसल्याने एक दिवस वाढल्याने ग्रामस्थांमध्ये
उत्साह संचारला होता.ग्रामस्थ एकत्र असल्याने संकष्टी चतुर्थी सर्वांनी आनंदात एकत्र मोदक बनवून आरती भजनात रंगून साजरी केली होती. गावपळणीत आचरे वासिय १५डिसेंबरपासून वेशीबाहेर
कुणी राहुट्या उभारून राहिले होते. तर कुणी नातेवाईकांच्या निवासस्थानी वास्तव्याला गेले होते काहींनी धार्मिक सहली मध्ये सहभागी होत या काळात धमाल मस्ती मौज मजा करत चार दिवस आनंदात घालवले होते .महिलांनी फुगडी संगीत खुर्ची पावले नृत्य यांच्या तालावर ठेका धरला होता तर भजन पारंपरिक कलां बरोबरच फनी गेम्स पत्त्यांचा डाव ,कबड्डी, क्रिकेट, कोंबड्यांच्या झुंजी या खेळांचा आधार घेत चार दिवस जल्लोषात आनंदात काढले होते.. बुधवारी चौथ्या दिवशी कौल न झाल्याने पुन्हा गुरुवारी दुपारी गावपणीच्या पाचव्या दिवशी बारा पाच मानकरयांनी रामेश्वर मंदिरात येऊन देवाला गाव भरण्याचा कौल घेतला देवाने कौल दिल्याबरोबर गाव भरण्याच्या इशाऱ्याची तोफ वाजली . तोफेचा आवाज कानी पडताच पुन्हा वेशीबाहेर गेलेले ग्रामस्थ गावाच्या , घराच्या ओढीने घरी येण्यास सुरुवात केली होती.