गोवा पोलिसांनी दंडात्मक कारवाईकडे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी वेधले लक्ष

सावंतवाडी दि.१९ डिसेंबर
गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण टॅक्सी चालक म्हणून सेवा देतात, त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचा चालक परवाना असल्याने गोवा पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे याकडे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे लक्ष माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी वेधले आहे.
गोव्यात टॅक्सी चालक म्हणून सेवा देणाऱ्या सिंधुदुर्गच्या युवकांच्या समस्येबाबत प्रवीण भोसले यांनी लक्ष वेधले. युवकांना आर्थिक भूर्दंडातून दिलासा द्यावा अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली. याला डॉ. सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. ‌

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची गोव्यातील प्रतिष्ठित उद्योगपती डॉ. प्रफुल्ल हेदे यांच्या कौटुंबिक कार्यक्रम निमित्ताने भेट झाली. या भेटीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील हजारो तरुण कामधंदा व नोकरीसाठी रोज जात असतात, बरेच तरुण गोव्यातील टॅक्सी चालक म्हणून मोपा विमानतळ, रेल्वे स्टेशनला टुरिस्ट कार वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देतात. या असंख्य ड्रायव्हर यांना गोव्यातील पोलीस महाराष्ट्र लायसन्स, टॅक्सी बॅच असतानाही गोवा राज्याचा टॅक्सी बॅच पाहिजे असा आग्रह करतात. बराच वेळा दंड ही वसूल केला जातो. यामुळे या युवकांना आर्थिक भूदंड सोसावा लागतो असं सांगत श्री. भोसले यांनी डॉ. प्रमोद सावंत यांच लक्ष वेधलं.

दरम्यान, याबाबत रीतसर लक्ष घालून गोवा राज्याचे गृहसचिव यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी चालकांना न्याय देईन अशी सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री. भोसले यांना दिले आहे.
सिंधुदुर्ग गोवा टॅक्सी चालक संघटनेचे प्रमुख बांदा येथील रहिवासी लक्ष्मण तर्फे यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्याकडे हा प्रश्न बरेच वेळा मांडला होता. त्याला अनुसरून प्रवीण भोसले यांनी या प्रश्नांची उकल घेतली.