कोकणातून मुंबईत जाणाऱ्या एसटी बस गाड्या मंत्रालयापर्यंत न्याव्यात-अध्यक्ष वसंत केसरकर

सावंतवाडी दि.१९ डिसेंबर 
कोकणातून मुंबईत जाणाऱ्या एसटी बस गाड्या मंत्रालयापर्यंत न्याव्यात अशी मागणी सिंधुदुर्ग एसटी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष वसंत केसरकर यांनी केली आहे. ते म्हणाले,सध्या एसटी बस दादर पर्यंत जातात.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व महाव्यवस्थापक यांना निवेदन देऊन केसरकर यांनी ही मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, कोकणातून मुंबईला जाणाऱ्या एसटी बस गाड्या दादर स्टेशन पर्यंत जातात. कोकणातील बहुसंख्य प्रवासी मंत्रालयात कामाच्या निमित्ताने जात असतात त्या प्रवाशांना दादर ते मंत्रालय प्रवास टॅक्सी ने करावा लागतो. या त्रासदायक प्रवासापासून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सर्व गाड्या मंत्रालयापर्यंत जाव्यात त्यामुळे त्रास आणि आर्थिक कुचंबणा थांबेल असे त्यांनी म्हटले आहे.