श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालय चिंदर अध्यक्षपदी प्रकाश मेस्त्री….

उपाध्यक्षपदी संतोष पाताडे, खजिनदारपदी सिताराम (देवेंद्र) हडकर तर सचिवपदी हेमांगी खोत

आचरा,दि.६ फेब्रुवारी

श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालय चिंदरची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पूर्ण प्राथमिक शाळा चिंदर नं 1 येथे संस्थेचे सभासद धोंडी चिंदरकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. संस्थेचे दिवंगत अध्यक्ष प्रभाकर पाताडे, उपाध्यक्ष भालचंद्र केळकर, खजिनदार संदिपभाई पारकर तसेच दिवंगत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरुवात झाली.
यावेळी वाचनालय कार्यकारिणीचा कालावधी संपल्यामूळे नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश दिनकर मेस्त्री, उपाध्यक्ष पदी संतोष प्रभाकर पाताडे, खजिनदार पदी सिताराम (देवेंद्र) हडकर, सहखजिनदार पदी रावजी तावडे तर सचिवपदी हेमांगी खोत यांची फेरनिवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य विकास पाताडे, संतोष गावकर, महेंद्र मांजरेकर, विवेक(राजू)परब, गोपाळ चिंदरकर, प्रकाश खोत यांची एक मताने निवड करण्यात आली.
यावेळी भालचंद्र गोलतकर, सुबोध गावकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, मनवा चिंदरकर, शशिकांत नाटेकर, आशिष कोरगावकर, सिद्धेश गोलतकर, अशोक पाताडे आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांचे सभाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते व ग्रंथपाल, सरपंच स्वरा पालकर यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रास्ताविक रावजी तावडे यांनी तर आभार हेमांगी खोत यांनी मानले.