प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लामार्फत दाभोली येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कुडाळ,दि.१९ डिसेंबर

एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत (एमआयडीएच) मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला मार्फत एकात्मिक फलोउत्पादन विकास योजने (एमआयडीएच) अंतर्गत मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली या गावात १७ डिसेंबर रोजी करण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गाची सुरूवात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथिल डॉ. व्ही. एस. देसाई, किटकशास्त्रज्ञ, उमेश गोवेकर, सरपंच ग्रामपंचायत दाभोली, एल. एस. खापरे, प्रभारी अधिकारी रोपवाटीका, एस. एस. भुरे, वरीष्ठ संशोधन सहाय्यक, डॉ. एम. पी. सणस, क. उद्यानविद्यावेत्ता, डॉ. एस. एस. मोरे, मृदाशास्त्रज्ञ, जंयती पवार, ग्रामपंचायत सदस्य व मनाली हळदणकर, माझी सरपंच ग्रामपंचायत दाभोली यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून विद्यापीठ गीत व राज्यगीताने करण्यात आली. कार्याक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये ललित खापरे यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. डॉ. विजयकुमार देसाई यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषवून उपस्थित शेतकऱ्यांना मसाला पिक लागवडीची गरज याविषयी मार्गदर्शन केले.

तांत्रिक सत्रामध्ये डॉ. विजयकुमार देसाई, ललित खापरे, सचिन भुरे, डॉ. मैथिलेश सणस व डॉ. सागर मोरे यांनी अनुक्रमे मसाला पिक एकात्मिक किड व रोग नियंत्रण, कोकम लागवड व प्रक्रिया, विद्यापीठाचे कृषितंत्रज्ञान माहितीसाठी विद्यापीठाचे युटयुब चॅनल व अॅप, काळीमिरी लागवड व प्रक्रिया, खत व्यवस्थापन इ. विषयाची सविस्तर माहिती सादरीकरणातून दिली. सदर कार्यक्रमासाठी गावातून मोठया संख्येने उपस्थित राहीलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण साहित्य म्हणून घडीपत्रीका, लिखाण साहित्य, जायफळ, काळीमिरी, दालचिनी, कलमे भेट म्हणून देण्यात आली. प्रशिक्षणा दरम्यान प्रदर्शित केलेल्या मसाला पिकाच्या मुल्यवर्धित प्रक्रियायुक्त पदार्थाच्या प्रदर्शनाचा लाभ उपस्थिीतांनी घेतला.

सचिन भुरे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. सहभागी प्रशिक्षणांर्थीनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले. आयोजनामध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक, डॉ. अशोककुमार चव्हाण, सर्व शास्वज्ञ, दाभोली गावातील नागरीक प्रभाकर विश्वनाथ जोशी, प्रशिक्षण सभागृहाचे व्यवस्थापक उमेश जोशी, कृषि सहाय्यक अमोल माळी, कृषि सहाय्यक समिर म्हापुसकर, उदय ठाकर, प्राचीन वेंगुर्लेकर, दिनेश मराठे, दशरथ पेडणेकर, अमित बागवे, संजय परब, भूषण जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.