एनसीसीच्या स्तुत्य उपक्रमातून पाण्याच्या स्रोताला गती–ऑफिसर आर्या भोगले.
फोंडा -उगवाई नदीवरील दरवर्षीप्रमाणे वनराई बंधाऱ्याची निर्मिती !
फोंडाघाट, दि.१९ डिसेंबर (संजय सावंत)
फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट, ग्रामपंचायत फोंडाघाट आणि कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीसी कॅडेट्स यांनी ग्रामपंचायतीं नजीक उगवाई नदीवर प्रतिवर्षाप्रमाणे वनराई बंधारा बांधला. यावेळी बोलताना सरपंच सौ संजना आग्रे यांनी, या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना, श्रमदानातून शिक्षण हा संस्कार, मुला-मुलींना भावी आयुष्यात योग्य दिशा दाखवेल असा विश्वास व्यक्त केला. ऑफिसर आर्या भोगले यांनी, एनसीसी उपक्रमांतर्गत बांधलेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे, परिसरातील विहिरींच्या पाण्याचा स्रोत प्रवाही राहून, नागरिकांना पिण्याच्या अथवा भाजीपाला निर्मितीसाठी, पाण्याचा प्रश्न निकाली लागेल, असे मत व्यक्त केले. यावेळी लाड सर, ग्रामपंचायत सदस्य, कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ . शेट्ये आणि इतर कर्मचारी तसेच एनसीसी कॅडेट्स यांनी बंधारा निर्मिती पूर्ण केली. या उपक्रमाचे फोंडाघाट पंचक्रोशी कौतुक होत असून समाधान व्यक्त होत आहे…