देवगड,दि.१९ डिसेंबर
वडिलोपार्जित जमीन भाड्याने देण्याच्या व त्यातील मिळालेल्या मोबदल्याच्या कारणावरून शिवीगाळ केली व घरातील हॉलमध्ये लाकडी मुठीची हातोडी घेऊन सख्ख्या भावाने आपल्या डोक्यावर वडिलांच्या डोक्यावर व गालावर दुखापत केली अशी फिर्याद निखिल सुबोध परब रा. जामसंडे बाजारपेठ यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या घटनेतील संशयित आरोपी निशिकांत सुबोध परब वय (३६) यांच्याविरुद्ध बी. एन. एस. त्यानंतर एक दोन ११८(१)(२) ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना १८ डिसेंबर रात्री ९ वा. जामसंडे बाजारपेठेतील घडली अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिरगावकर करीत आहेत.