कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी आकाश तांबे यांची सर्वानुमते निवड

तळेरे,दि.६ फेब्रुवारी

कोल्हापूर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या सभेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर ,परभणी, लातूर, यवतमाळ बुलढाणा, पालघर, ठाणे अशा राज्यभरातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या शिक्षक सभासदांच्या उपस्थितीमध्ये आकाश तांबे यांची राज्याचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

रवींद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष गौतम वर्धन यांनी उपस्थितांचे स्वागत केले.राज्य कार्यकारिणी पदाधिकारी ,विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व सदस्य यांचे सत्कार केले. प्रास्ताविक -राज्य उपाध्यक्ष किरण मानकर यांनी केले.त्यानंतर आकाश तांबे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्याला सभागृहाने सर्वांनु मते मंजुरी दिली.
त्यानंतर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा कार्य अहवाल व वार्षिक ताळेबंद तत्कालीन सरचिटणीस आकाश तांबे यांनी सादर केला व या सर्वसाधारण सभेने ताळेबंद मंजूर केला.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची मुदत संपली असल्यामुळे नवीन कार्यकारणी निवड करण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जेष्ठ नेते नामदेव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक अधिकारी नामदेव कांबळे यांनी अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागितली.यावेळी सभागृहांमध्ये सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी ठराव मांडला- कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याचे नवीन अध्यक्ष म्हणून आकाश तांबे यांची निवड करण्यात यावी. या ठरावाला अनुमोदक म्हणून लातूर जिल्ह्याचे संघटन सचिव महेश कांबळे यांनी अनुमोदन दिले. सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी आकाश तांबे यांच्या नावाच्या ठरावाला आवाजी मतदानाने मंजूर केला. निवडणूक अधिकारी नामदेव कांबळे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आकाश तांबे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी कार्याध्यक्ष म्हणून रवींद्र पालवे यांची सुद्धा सर्वांमध्ये निवड करण्यात आली .
आकाश तांबे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुभाष म्हस्के (लातूर), श्रीसेल कोरे (सोलापूर) ,संजय खरात (सातारा) , धम्मपाल उकडे (परभणी),श्रीमती निवेदिनी (सांगली), सुनील घस्ती (सिंधुदुर्ग) व अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. त्याचबरोबर आकाश तांबे यांना राज्यभरातील जिल्ह्यातून आलेल्या सर्व सभासदांनी शुभेच्छा दिल्या.
राज्य अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आकाश तांबे यांनी आपले विचार मांडत असताना राज्यातील शिक्षक व शिक्षिका सभासदांनी सर्वानुमते अध्यक्षपदी माझी निवड करून जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पुढील काळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्य अधिक गतिमान आणि पारदर्शक करणार. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या , प्रश्नाबाबत अधिक जागृतीने अभ्यासपूर्ण व आक्रमक भूमिका घेऊन काम केले जाईल. राज्यातील विविध मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षक बांधव कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या प्रवाहात आणण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न केले जातील. कास्ट्राईब शिक्षक संघटनेला फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा आहे आणि म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटना ही फुले-शाहू-आंबेडकर विचारांची चळवळ आहे. म्हणून यापुढे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात काम करेल.
यावेळी राहुल गायकवाड मुख्य संघटन सचिव (विभागीय अध्यक्ष लातूर) , महेश कांबळे संघटन सचिव , बाजीराव प्रज्ञावंत (विभागीय अध्यक्ष कोल्हापूर) , राजेंद्र वाघमारे (विभागीय अध्यक्ष अमरावती), ज्ञानेश्वर कुंभरे , डॉ.पारस जाधव ( राज्य कार्यकारिणी सदस्य) प्रशांत मोरे (विभागीय अध्यक्ष पुणे), तुषार आत्राम (जिल्हाध्यक्ष यवतमाळ ),प्रशांत बोर्ड (जिल्हाध्यक्ष बुलढाणा ) प्रदीप वाघोदे ( जिल्हाध्यक्ष रत्नागिरी) , श्रीसेल कोरे ( जिल्हाध्यक्ष सोलापूर) ,सुभाष म्हस्के (जिल्हाध्यक्ष लातूर) , सुनील घस्ती ( जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग), प्रमोद काकडे (जिल्हाध्यक्ष सांगली ) , संजय खरात (जिल्हाध्यक्ष सातारा ), धम्मापल उकडे (जिल्हा सचिव परभणी ) या बरोबर राज्यातील अनेक सभासद उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्याचे-
पालशेतकर रामदास,
मुकद पाटील, निवास
चावरे, हिरालालसर
अनिल चव्हाण ,दिपक कांबळेसर ,प्रशांत जाधव ,प्रेरणा जाधव,कुणाल तडवी, सौ.चव्हाण मॅडम
वैभव जाधव,तानाजी कांबळे ,सुरेश माने,
प्रभाकर कांबळे ,बिपिन मोहिते
सांगली जिल्ह्याचे प्रदीप गवळीउत्तम मंगल,विद्याधर रास्ते, सुरेश कोळी-कार्याध्यक्ष,
संगिता कांबळे,शुभांगी शिंगे ,सौ. विनोदिनी मिरजकर,भगवान भंडारे (मुख्याध्यापक ) ,डी.के. कांबळे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून
संजय राठोड (मुख्याध्यापक), विकास पवार,माणिक वंजारे ( मुख्याध्यापक) ,सुधीर तांबे ( मुख्याध्यापक),
संजय भोसले, समीर नाईक इत्यादी अनेक सभासद उपस्थित होते.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन संजय कुर्डुकर (कोल्हापूर) , इतिवृत्त वाचन पी. डी. सरदेसाई तर आभार प्रदीप वाघोदे (रत्नागिरी) यांनी मानले.