दोडामार्ग, दि. १९ डिसेंबर
हेवाळे गावात जंगली टस्कर हत्ती दिवसाढवळ्या नदी पाञात गावात भितीचे वातावरण वन विभाग यांनी दिवसा राञी वन कर्मचारी तैनात करावी अशी मागणी गुरुवारी हा टस्कर हत्ती हेवाळे गावात दाखल झाला.
चंदगड तालुक्यातील कळसगादे तिलारी नगर येथे दहशत निर्माण करणारा टस्कर राजा हत्ती चार दिवसांपूर्वी बांबर्डे घाटीवडे येथे दाखल झाला आहे. हा हत्ती नुकसान करत पुढे सरकत हेवाळे गावात दाखल झाला. दिवसाढवळ्या सुळेधार राजा टस्कर हत्ती दिसताच काही जणांनी व्हिडिओ काढला.
हेवाळे गावात दाखल झालेल्या टस्कर राजा हत्ती मुळे भितीचे वातावरण तयार झाले आहे, वन विभाग यांनी कर्मचारी तसेच हाकारे नेमावे अशी मागणी केली आहे.