आकाश फिश मिल कंपनीकडून समुद्रात टाकल्या जाणाऱ्या पाईपलाईनला विरोध…

केळुस कालवीबंदरवासिय निर्णयावर ठाम ,आकाश फिश मिल कंपनीला आमचा विरोधच नाही!

सिंधुदुर्ग,दि.२० डिसेंबर 

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस येथील मे. आकाश फिश मिल व फिश ऑईल लिमिटेड कंपनीला आमचा विरोध नाही. पण कंपनी जे वेस्टेज पाणी पाइपलाईनद्वारे समुद्रात सोडत आहे, त्याला विरोध आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल. तसेच या पाण्याचा परिणाम आता न दिसता कालांतराने दिसून येईल, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे