राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी २२ रोजी जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा

मालवण,दि.२० डिसेंबर

मुंबई बिर्ला पब्लीक स्कूल, कल्याण येथे दि. २९ ते३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय पुरूष सिनीयर बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संघ निवड चाचणी स्पर्धा रविवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे होणार आहे.

तरी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूने निवड चाचणीला उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव संजय पेंडूरकर ९४२२३९२७९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष विलास वाईरकर व उपाध्यक्ष ऋषिकेश नाईक यांनी केले आहे.