मालवण,दि.२० डिसेंबर
सहकार महर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने वराडकर हायस्कूल कट्टा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात २३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर, प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक संजय गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आभाळमाया ग्रुपचे सर्वेसर्वा राकेश डगरे, जी. एच. फिटनेस कट्टा चे गौरव हिर्लेकर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे सचिव श्री सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, डॉ. सोमनाथ परब, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, सौ.मनीषा साळगावकर , श्रीमती रेखा डीचोलकर, श्रीमती राजश्री उर्फ बेबी डगरे, मानसी परब, सौ. श्रद्धा नाईक, राणी डगरे, वराड सरपंच सौ.शलाका रावले, वराड उपसरपंच गोपाळ परब, वराड गावचे तंटामुक्ती अध्यक्ष छोटू ढोलम, उद्योजक समीर रावले, उद्योजक प्रवीण मिठबावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. संजय गावडे, अजयराज वराडकर यांनी मनोगत व्यक्त केले
या शिबिरास माजी आमदार वैभव नाईक , शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत ,वराड गावचे सुपुत्र उद्योजक बाळा चिंदरकर, माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर , मिठबावचे माजी सरपंच भाई नरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, सामाजिक कार्यकर्ते दीपा सावंत, पेंडूर उपसरपंच सुमित सावंत, कुणकावळे सरपंच मंदार वराडकर, विनोद सांडव, अर्जुन चिंदरकर आदिनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या
यावेळी आभाळमाया ग्रुपच्या वतीने श्री भाई नरे यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच तब्बल 57 वेळा रक्तदान करणारे शेखर मसुरकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याबरोबरच NDRF च्या जवानांनीही रक्तदान केले.