वैश्यवाडा सावंतवाडी येथील रहिवासी दीनानाथ पांडुरंग मिशाळ यांचे निधन

सावंतवाडी,दि.२० डिसेंबर
वैश्यवाडा सावंतवाडी येथील रहिवासी दीनानाथ पांडुरंग मिशाळ यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. पंचायत समिती सावंतवाडी चे ते सेवा निवृत कर्मचारी होते. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी (जेपी) म्हणून नियुक्ती केली होती. कराओके गायक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, आई, भाऊ, वहिनी , पुतणे, पुतणे असा मोठा परीवार आहे. रिक्षा व्यावसायिक साई मिशाळ, आनंद मिशाळ, प्रमोद मिशाळ यांचे ते भाऊ होत.