शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे पंधालयाच्या सहयोगाने एक दिवसीय प्रेरणा साहित्य संमेलनाचे आयोजन

सावंतवाडी,दि.२० डिसेंबर
आजगांव (सिंधुदुर्ग) पेधील साहित्य प्रेरणा कट्ट्‌याच्या सलग पन्नासाव्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून बुधवार दि.२५ डिसेंबर रोजी शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील रघुनाथ गणेश खटखटे पंधालयाच्या सहयोगाने एक दिवसीय प्रेरणा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील खटखटे ग्रंथालयात होणान्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी गोव्यातील लोककला व लोकसाहित्याच्या अभ्यासक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. पौर्णिमा केरकर यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. उद्घाटन सोहळ्यास संमेलनाध्यक्ष पौर्णिमा केरकर यांच्या समवेत उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री, खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश म्हस्के, साहित्य प्रेरणा कट्ट्‌याचे समन्वयक विनय सौदागर व सिंधुदुर्ग जिल्हा पंधालयाचे मुख्याधिकारी सचिन हजारे हे मान्यवर उपस्थित असतील.

दुपारी ११.१५ वाजता ‘वाचनवृद्धीसाठी मी केलेले प्रयोग’ या विषयावर प्रा. विजय कातरफेकर (सावंतवाडी) याच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात प्राचार्य गजानन मांदेकर (गोवा) व सुरेश ठाकुर (आचरा) हे भाग घेतील.

दुपारी १२.३० वाजता सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर यांच्या ‘मुबाई’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन निवृत्त शासकीय अधिकारी सतीरा लळीत यांच्याहस्ते शिरोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच लतिका रेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दुपारी १ वाजता कणकवली पेथील आचरेकर प्रतिष्ठानने सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त काढलेल्या ‘रंगवाचा’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन होईल.

भोजनोत्तर पहिल्या सत्रात दुपारी २.१५ वाजता सुप्रसिद्ध कवी डॉ. सुधाकर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक तसेच निमंत्रित कवींचे कविसंमेलन होईल.

तद्नंतर दुपारी ३.३० वाजता ‘स्मरण जयवंत दळवीचे.. पा कार्यक्रमात दळवींची पुतणी शुभा कुलकर्णी या ‘आमचे जयकाका या विषयावर बोलतील, तर सोनाली परब (गोवा) या दळवींच्या वाट ही सरैना या कथेचं वाचन करतील. जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी प्रीत्यर्थ साहित्य प्रेरणा कट्टा व खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या खुल्या साहित्य चचविषयी ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे निवेदन करतील. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरणही या सत्रात होणार आहे.

संध्याकाळी ४.३० वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमात के जयवंत दळवी यांचा मरणोत्तर गौरव करण्यात पेणार असून, विविध ठराव पारित केल्यानंतर संमेलनाध्यक्ष पौर्णिमा केरकर यांच्या भाषणाने संमेलनाची सांगता होईल.

संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन के. जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी हे करतील.