देवगड महाविद्यालय सभापती पदी एकनाथ तेली यांची निवड झाली त्याबद्दल देवगड जल्लोष समितीच्या वतीने सत्कार

देवगड,दि.२० डिसेंबर

श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व देवगड महाविद्यालय सभापती पदी एकनाथ तेली यांची निवड झाली त्याबद्दल देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगड व जल्लोष समिती अध्यक्ष हनिफ मेमन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था अध्यक्ष हनीफ मेमन उपाध्यक्ष श्रीपाद पारकर,,सचिव मिलिंद मोहिते सहसचिव संदेश शिरसाट ,खजिनदार मधुकर नलावडे, सदस्य दयाळ गावकर,शामराव पाटील ,मिलिंद मोर्ये, दयानंद पाटील, दिग्विजय कोळबकर, दिनेश पटेल, मिलिंद खडपकर ,व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, वेदा हॉटेल व्यवस्थापक अनिकेत बांदिवडेकर, एकनाथ तेली उपस्थित होते.