पुरवठा विभागामार्फत गणणा करण्यासाठी गावागावात शिबिराचे आयोजन करावे…

कालवी टेंबवली येथील ग्रामस्थांची पुरवठा विभागाकडे मागणी!

देवगड,दि.६ फेब्रुवारी

महसूल प्रशासन। पुरवठा विभागामार्फत रास्त दराच्या धान्य दुकानाद्वारे कुटुंबातील व्यक्तींची गणणा करण्याच्या कारणास्तव कुटुंबातील सर्व व्यक्तींना धान्य दुकानात दुकानदाराकडे जावे लागत आहे. मात्र ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून काही कुटुंबातील व्यक्ती वयोवृद्ध, दिव्यांग तसेच आजारपणामुळे उपचार घेत असताना त्यांना रास्त दराच्या धान्य दुकानात येणे शक्य होत नाही. त्यामुळे पुरवठा विभागामार्फत गावागावात शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कालवी टेंबवली येथील ग्रामस्थांनी पुरवठा विभागाकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की,आपल्या तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत गावपातळीवरील रास्त दराच्या
धान्य दुकानाद्वारे गावागावांतील नागरिकांना धान्य वितरित करण्यात येते. अलिकडे काही वर्षांत
लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीचा अंगठा मशीनवर (थंब) घेऊन धान्य देण्यात येते. इथपर्यंत नागरिक सहन
करत होते. मात्र सध्या कुटुंबातील व्यक्तींची गणणा करण्याच्या कारणास्तव कुटुंबातील सर्व व्यक्तींना
धान्य दुकानदाराकडे जावे लागत आहे. मात्र यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. काही कुटुंबातील
व्यक्ती वयोवृद्ध, दिव्यांग तसेच आजारामुळे उपचार घेत असतात. अशावेळी सर्वच व्यक्तिंना रास्त
दराच्या धान्य दुकानात जाणे शक्य होत नाही. ही बाब खर्चिक आहे. तसेच अनेक अडचणींवर मात
करून दुकानात गेल्यावर नेटवर्क समस्यांमुळे वयोवृध्द, आजारी व्यक्तींना तेथे ताटकळत बसावे लागते.
यामुळे असे लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. लाभार्थी गणणा करण्याला आमचा
विरोध नाही. मात्र यासाठी गावपातळीवर कॅंप लावल्यास सर्वांना सोयीचे होईल. कॅप
गणणा करण्यात यावी. यासाठी आपल्या स्तरावर कँप लावण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी
आमची मागणी आहे. निवेदनाद्वारे केली आहे.या वेळ,
ग्रामपंचायत सदस्य शेखर धुरी पांडुरंग घाडी, शत्रुघ्न जावकर, सुरेश गावकर ,अरविंद शिंदे, अनिल घाडी, विद्याधर तांबे ,शांताराम गायकवाड, योगेश शिंदे,चंद्रकांत फाळके,संतोष पारकर आणि शरद शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.