मुंबई,दि.२० डिसेंबर
देवगड तालुक्यातील आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ,मुंबई यांचे १४ वे वार्षिक स्नेहसंमेलन मंडळाचे अध्यक्ष सतीश रा. कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.२२ डिसेंबर रोजी सायं.४ वा.भांडुप स्टेशन रोड येथील गीता हॉल मध्ये आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रसंगी माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवीधर परीक्षेत प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, डिसेंबर २३ ते नोव्हेंबर २४ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सदस्यांचा सत्कार, हळदी कुंकू समारंभ, ग्रामस्थ बंधू भगिनी व मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देणगीदारांचे आभार प्रदर्शन व स्नेहभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती करण्यात आली आहे.