मालवण,दि.२० डिसेंबर
भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचालित भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मालवणचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा. मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे संपन्न होणार आहे.
स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमास उदघाटक म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय चव्हाण, प्रमुख अतिथी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारी एज्युकेशन सोसायटीचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर तसेच संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मान्यवरांचा सत्कार तसेच बेस्ट स्टुडंट पुरस्कार, आदर्श विद्यार्थी पुरस्कार (कनिष्ठ महाविद्यालय) वितरण होणार आहे. तसेच माजी विद्यार्थी युवा संघटनेकडून देण्यात येणारा स्व. टेमकर स्मृति आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण कार्यक्रमानंतर दुपारी १२ वा. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तर २७ रोजी सकाळी ८. ३० वा. माध्यमिक विभाग आणि दुपारी २. ३० वा. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे गुणदर्शनपर कार्यक्रम सादर होणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे पदाधिकारी, स्थानिक कमिटीचे पदाधिकारी यांनी केले आहे.