गोवा राज्यात अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ९ डंपर्स वर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी १४ लाख रुपये दंडाची कारवाई

सावंतवाडी,दि.२० डिसेंबर
गोवा राज्यात अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ९ डंपर्स वर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी १४ लाख रुपये दंडाची कारवाई केली आहे. या पैकी पाच डंपर्स मालकांनी ८ लाख रुपयांचा दंड जमा केला आहे.
गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात काळा दगड आणि वाळू वाहतूक केली जाते. वाहतूक करणाऱ्या डंपर चालक मालक यांच्याकडे परवाना नसल्याने तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन दंडाची कारवाई केली आहे.
या ९ डंपर्स पैकी पाच मालकांनी ८ लाख जमा केले आहेत तर अन्य ४ डंपर वर ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तेही उद्या ही रक्कम जमा करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई करण्यात येत आहे. अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मी माझं कर्तव्य पार पाडत आहे.