वेंगुर्ला,दि.२० डिसेंबर
वेंगुर्ला तालुका परिट सेवा संघातर्फे श्री संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधवांनी समाज जागृत होण्यासाठी योगदान द्यावे असे ठरविण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवारी २० डिसेंबर रोजी भटवाडी येथील कोकण किनारा येथे पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांबाबत आपले विचार मांडले. परिट सेवा संघाचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य विवेक आरोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मूळचे वेंगुर्ला येथील आणि मुंबई-विरार येथे वास्तव्यास असलेले समाजबांधव किरण आरोलकर हे आपली नोकरी संभाळून गेली दहा वर्षे समाजकार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अलिकडेच त्यांना गोवा बुक रेकॉर्डतर्फे त्यांना ‘बाबा आमटे पुरस्कार‘ प्राप्त झाला आहे. त्याबद्दल वेंगुर्ला तालुका परिट सेवा संघातर्फे त्यांचा सत्कार आयोजित केला होता. दरम्यान, अपरिहार्य कारणामुळे किरण आरोलकर हे उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांचा हा सत्कार त्यांचे वडील दत्ताराम आरोलकर यांनी स्वीकारला. यावेळी परिट सेवा संघाचे वेंगुर्ला अध्यक्ष महेंद्र आरोलकर यांच्यासह गुरूनाथ मडवळ, अशोक आरोलकर, उमेश आरोलकर, सुभाष आरोलकर, तात्या सांगेलकर, सुभाष सांगेलकर, दत्ताराम आरोलकर, महेश वेंगुर्लेकर, जया आरोलकर, किशोर कोलगांवकर, शेखर वेंगुर्लेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.