श्रमसंस्कार शिबिर देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावी सात दिवस यशस्वीरीत्या संपन्न

देवगड,दि.२० डिसेंबर 

शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावी सात दिवस यशस्वीरीत्या संपन्न झाले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिरामध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन, महिला सबलीकरण, पारंपारिक व्यवसायाची ओळख, ऐतिहासिक वारसा जतन या प्रमुख प्रकल्पांवर भर देण्यात आला होता. शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात प्रार्थना, योगासने व श्रमदानाची कामे करण्यात आली. सकाळच्या सत्रातील श्रमदानामध्ये कुणकेश्वर गांवातील समुद्र किना-याची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, वसुंधरा इ- शपथ इ. उपक्रम घेण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यशाळा, पारंपारिक वाद्य कार्यशाळा, शिवकालीन युद्धकला कार्यशाळा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे या विषयांवरील कार्यशाळा घेण्यात आल्या. महिलांकरिता स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेण्यात आले. प्राचीन कुणकेश्वर शिवालय, पारंपारिक मासेमारी व्यवसाय ( रापण ) ची ओळख, महिला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, कांदळवनांचे महत्त्व, सामाजिक व्यसनाधिनता, महिला आरोग्य जागृतता या विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कारामध्ये शिक्षण विकास मंडळाचे सभापती . एकनाथ तेली, सहकार्यवाह . तुकाराम तेली यांच्या संकल्पनेतून साकारलेला सहस्रचंद्रदर्शन हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. कुणकेश्वर गावातील ८१ वर्षावरील २७ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या उपक्रमांतर्गत करण्यात आला. शिक्षण विकास मंडळाचे सभापती . एकनाथ तेली, सहकार्यवाह . तुकाराम तेली, तंटामुक्त समिती, कुणकेश्वरचे अध्यक्ष श्री. दिपक घाडी, तंटामुक्त समिती, कुणकेश्वरच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी तेली, कुणकेश्वर मधील बचत गटाच्या प्रतिनिधी सौ. दिपिका मुणगेकर, कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. निलेश पेडणेकर, देवगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद शेटे, पर्यवेक्षक प्रा. रमाकांत बांदेकर, यांच्या शुभहस्ते ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी . विनोद चिंदरकर, सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. मनाली गांवकर व प्रा. श्री. स्वप्निल वाळके यांनी विशेष श्रम संस्कार शिबिर यशस्वी करण्यात विशेष परिश्रम घेतले.